पुणे – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला आग लागली असून अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मांजरीच्या साईडला असणाऱ्या सिरमच्या नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे समजते. आग कशी लागली हे अद्याप समजलेले नाही. करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
Updated News : सिरम इन्स्टिट्यूट ‘अग्नितांडव’ ; तब्बल 4 तासांनी आग ‘आटोक्यात’
मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्युट कंपनीला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने एक तास झाली तरी आग आटोक्यात येत नाही.
मध्ये एक मोठा ब्लास्ट ही झाला असून परिसरात बघ्यांची प्रचंड मोठी गर्दी जमली आहे.
मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्युट कंपनीचे सेझ युनिट आहे.त्यातील एका इमारतीच्या संपूर्ण सहाव्या मजल्यावर आग पसरली असून पाचव्या मजल्यावर जावून आग विझविण्यााठी प्रयत्न सुरू आहेत.
मोठी बातमी ! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अगीत 5 जणांचा मृत्यू
याशिवाही इमारतीच्या एका बाजूने बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता इतकी आहे की अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारले तरी काही वेळाने पुन्हा तेवढ्याच ताकदीने पुन्हा आगीच्या ज्वाळा भडकत आहेत.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा