Updated News : करोना लस बनविणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ला भीषण आग; दोन तासाच्या प्रयत्नानंतरही आग नियंत्रणाबाहेर

पुणे –  मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्युट कंपनीला मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या वतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने एक तास झाली तरी आग आटोक्यात येत नाही. बीसीजी लस बनवण्याच्या युनिटला आग लागली असून  करोना लस सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्ये एक मोठा ब्लास्ट ही झाला असून परिसरात बघ्यांची प्रचंड मोठी गर्दी जमली आहे. मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्युट कंपनीचे सेझ युनिट आहे. त्यातील एका इमारतीच्या संपूर्ण सहाव्या मजल्यावर आग पसरली असून पाचव्या मजल्यावर जावून आग विझविण्यााठी प्रयत्न सुरू आहेत.

Updated News : सिरम इन्स्टिट्यूट ‘अग्नितांडव’ ; तब्बल 4 तासांनी आग ‘आटोक्यात’ 

याशिवाही इमारतीच्या एका बाजूने बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीची तीव्रता इतकी आहे की अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारले तरी काही वेळाने पुन्हा तेवढ्याच ताकदीने पुन्हा आगीच्या ज्वाळा भडकत आहेत.

मोठी बातमी ! पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अगीत 5 जणांचा मृत्यू 

सुमारे दहा अग्निशमन दलाचे गाड्या येथे दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र दोन तास झाले तरी आग आटोक्यात येत नाही. इमारतीचा सहावा हा एकच मजला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. काम करणाऱ्या शेकडो कामगारांना अद्यापतरी बाहेर काढण्यात यश आले आहे.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली. दरम्यान आग लागल्याचे लक्षात येताच इमारतीत असलेले कामगार यांना बाहेर काढण्यात आले. तर अग्निशमन दलाचे जवान व कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी चौथ्या मजल्यावर जावून इमारतीच्या काचा फोडल्या व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. इमारतीच्या तीन बाजूने आगीचे प्रमाण अधिक होते. काळया धुराचे लोट बाहेर पडत होते. काही मिनिटं आग कमी होत होती,तर पुन्हा तेवढ्याच वेगाने आग पसरून खिडकीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. आगीच्या ज्वाळा बंद झाल्या असून काही प्रमाणात अजूनही धूर बाहेर पडत आहे.

‘ही under construction building होती. कॉर्पोरेट ऑफिस च्या फर्निचर चे काम सुरू होते. त्या साहित्याला आग लागली आहे. बीसीजी आणि कोवि ड वगैरे लसीचे युनिट येथून दीड किमी लांब आहे त्यामुळे सुदैवाने त्याला काही धोका नाही. सगळ्या लस सुरक्षित आहेत’ – चेतन तुपे आमदार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.