पुणे: पुणे विद्यापीठ चौकामधून, रेंजहिल्स चौकापासून पुढे शिवाजीनगर कडे येण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक १० ऑगस्ट (शनिवार) पासून दुहेरी करण्यात आली आहे. गणेशखिंड रोडवरील मेट्रोच्या बांधकामासाठी वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी,
पुणे वाहतूक शाखेकडून १ जून पासून पुणे विद्यापीठ चौकामधून, रेंजहिल्स चौकापासून पुढे शिवाजीनगर कडे येण्यासाठी गणेशखिंड रोडवरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता.
१० ऑगस्ट (शनिवार) गणेशखिंड रोडवर पुणे विद्यापीठ चौकामधून सिमला ऑफिस चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यावरील वाहतुक बदलांसदर्भातील यापूर्वीचे आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.