पुणे – पुणे शहर पोलिसांनी नऊ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण ५७ एन.डी.पी.एस गुन्हयातील जप्त केलेले अंमली पदार्थ मंगळवारी नष्ट केले. यामध्ये गांजा, एम.डी. इफेडीन, कोकेन, एल.एस.डी. चरस, अफिम पॉपीस्ट्रॉ, हेरॉईन व गांजा मिश्रीत बंटा गोळी असा अंदाजे ७ कोटी ७६ लाख १ हजार रुपयांचा ७८८ किलो ९५४ ग्रॅम अमंली पदार्थांचा समावेश होता. हा मुद्देमाल रांजणगाव येथील महाराष्ट्र इनव्हरमेंट पॉवर लिमीटेड कंपनीच्या प्लांटमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.
दरमयान नाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाचे वजन व परिक्षण पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर मुख्यालयात पोलीस मुख्यालयात ड्रग डिस्पोजल कमिटीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे, सदस्य उपायुक्त(गुन्हे) निखील पिंगळे, सदस्य उपायुक्त संदिप भाजीमाखरे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
ही प्रक्रिया ही पारदर्शी व्हावी, याकरिता सर्व नाश करण्यात येणारे मुद्देमालाचे परिक्षणाकरिता एफ.एस.एल. कडील तज्ञ तसेच राज्य उप्तादन शुल्क येथिल अधिकारी पंच म्हणुन नेमण्यात आले होते.
तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी तसेच सरकारी फोटोग्राफर/व्हिडीओग्राफर देखील उपस्थित आहेत. यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस निरीक्षक सुजित वाडेकर यांच्या पथकाने काम केले.