वाघोली : शिरूर हवेली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व भाजप पदाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून शिरूर हवेलीत मोठ्या उत्साहात स्वागत केले. शिरूर तालुक्यातील एका खाजगी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते यावेळी भाजप अधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांची सदिच्छा भेट घेतली.
शिरूर हवेली विधानसभेचे भाजपचे नेते प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव व इतर पदाधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांचा शिरूर हवेली मधील नागरिकांच्या वतीने सत्कार केला. यावेळी भाजपचे नेते प्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिरूर हवेली मध्ये जास्तीत जास्त निधी देऊन विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात आज अखेर पर्यंत भाजप यशस्वी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट ही कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा स्त्रोत असल्याचे भाजपचे नेते प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे यांनी सांगितले.