वाघोली – महायुतीला मिळालेले निर्विवाद वर्चस्व पाहता तरुणांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या अजित पवार यांच्या बाबतीत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढत असून ही वाढती पसंती सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिरूर हवेली मधील युवकांमध्ये अजित पवार यांच्या बद्दल प्रशासनातील काम करून घेण्याची हातोटी, नागरिकांची प्रश्न सोडवण्याची पद्धत तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ची धडपड लक्षवेधी ठरत असून ही अजित पवारांची वाढती क्रेझ सध्या तरुणांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
हवेली तालुक्यातील युवा नेता जयेश विलास कंद यांनी त्यांच्या मित्र मंडळाच्या समवेत अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील युवकांच्या वतीने सत्कार केला.
यावेळी जयेश कंद यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा एकमेव नेता म्हणून अजित पवार ओळखले जातात.
अजित पवारांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची पद्धत जनतेत आदराची भावना वाढवणारी असून ही भावना तरुणांना प्रेरणास्त्रोत बनली आहे. लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांचा देखील अजित पवारांकडून यथोचित आदर सन्मान राखला जात असल्याने तरुणांमध्ये अजित पवार चर्चेचा विषय बनले आहे.