पुणे – पाटील इस्टेट गल्ली नं.10 मधील पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेली 2 ते 3 महिने खराब झाली असून ती फुटली आहे. ही जलवाहिनी नाल्याच्या कचऱ्यातून जाते. कचऱ्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोकाक्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या भागातील नागरिकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, ही जलवाहिनी तातडीने दुरूस्त करावी अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांना “मनसे स्टाइल’ आंदोलन करीत फुटलेल्या जलवाहिनीचे दूषित पानी पाजले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
पाटील इस्टेटमधील पिण्याच्या पाण्याची लाइन दोन महिन्यांपासून फुटली आहे. जलवाहिनी ज्या नाल्यातून जाते तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात नाल्यातील कचर अडकतो. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या चतुःश्रुंगी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाकाऱ्यांकडेतक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी येथे येऊन “पाहणी’ करून गेले. पण, दोन महिने झाले संबंधीत अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असून नागारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या जलवाहिनीची दुरूस्ती तातडीने करावी, अशी मागणी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, शिवाजीनगर उपविभाग अध्यक्ष गोकुळ अडागळे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे चतुःश्रुंगी पाणी पुरवठा विभागाकडे केली आहे.