पुणे – पोर्शे कार अपघात प्रकाणानंतर पुणे शहरातील नाईट लाईफ देशभर चर्चेला आली होती. तसाच काहीसा अपघात रविवारी पहाटे टिळक रस्त्यावर घडला. सुदैवाने त्या क्षणी रस्त्यावर कोणतेही वाहन आणि पादचारी नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.
मात्र अपघातग्रस्त कार रस्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या शोरुमला धडकली. यामुळे शोरुम मालकाचे मात्र २० ते २२ लाखाचे नुकसान झाले आहे. येथून हाकेच्या अंतरावरच मॅरेथॉनसाठी हजारो लोक जमले होते.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सचे मालक मनमितसिंग हरबनसिंग छावरा (४७,रा. सॅलीसबरी पार्क) यांनी तक्रार दिली आहे. शिवपुत्र कमलाकर वेळ ( १९,रा. सत्यराज अंगण, काळेपडळ ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
त्याच्या सोबत त्याचे तीन मित्रही कारमध्ये होते. शिवपुत्र याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सचे मालक मनमितसिंग हरबनसिंग छावरा (४७,रा. सॅलीसबरी पार्क) यांनी तक्रार दिली आहे.
शिवपुत्र कमलाकर वेळ( १९,रा. सत्यराज अंगण, काळेपडळ ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या सोबत त्याचे तीन मित्रही कारमध्ये होते. शिवपुत्र याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही.