Pune News : पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सकाळी ८.०५ वाजता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह उपायुक्त आशा राऊत तसेच विविध विभागांचे उपआयुक्त, खातेप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हेही वाचा: Pune Crime News : मन सुन्न करणारी धक्कादायक घटना! आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; मुलीवरही प्राणघातक हल्ला