पुणे – आगामी पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची नावे स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी पक्षाने नुकत्याच नेमलेल्या निरीक्षकांना विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुक उमेदवारांचे अर्ज तसेच कार्य अहवाल स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पक्षाकडून शहरात 122 उमेदवार निवडून येतील असा दावा करत स्वबळाची तयारी करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार आता पक्षाकडून शहरातील इच्छुकांची नावे संकलित करण्याचे काम सुरू करत निवडणुका मध्ये उमेदवार निश्चितीसाठी आघाडी घेण्यात आली आहे.
पुढील सात ते आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय निरीक्षक आणि प्रभाग अध्यक्षाच्या माध्यमातून हे अर्ज स्विकारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.