पुणे – नौदल जवानाची आत्महत्या

पुणे -“नौदलाचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजी येथे बुधवारी एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश साईनाथ कन्नाला (वय 19) असे त्याचे नाव असून याप्रकरणी मुकेशकुमार चौधरी यांनी लोणावळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे.

आकाश हा मूळचा तेलंगणातल्या निर्मल जिल्ह्यातील आहे. तो नौदलात नाविक म्हणून रूजू झाला होता. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सुरक्षेच्या कामावर असलेले गार्ड योगेंद्र सिंह हे आयएनएस शिवाजी येथील गंगा ब्लॉक परिसराची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना दुसरा कर्मचारी भेटला. यावेळी त्यांनी आकाशबद्दल विचारण केली असता, तो बाथरूमला गेला असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही तो बाहेर न आल्याने त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. यावेळी त्यांना गंगा ब्लॉकजवळील मनोरंजन खोली बंद दिसली. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, बेडशीटच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आकाश दिसला. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. तसेच आकाशला आयएनएस येथील कस्तुरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्‍टरांनी त्याला तपासनू मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे नेमके अकारण अद्याप समजले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे आयएनएस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)