पुणे-नाशिक “शिवनेरी’ पुन्हा सुरू

पुणे – पुणे-नाशिक मार्गावरील वातानुकूलित शिवनेरी बससेवा एसटी महामंडळाने पुन्हा सुरू केली आहे. शिवाजीनगर बस स्थानकातून जाणारी शिवनेरी 1 नोव्हेंबर 2017 पासून बंद करण्यात आली होती. शिवशाहीमुळे शिवनेरीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे कारण महामंडळाने पुढे करत ही सेवा बंद केली होती.

पुणे-नाशिक मार्गावरील शिवनेरी सेवा सात वर्षांपासून सेवा सुरू आहे. या मार्गावरील बसचे तिकीट प्रति प्रवासी 605 रुपये असून दोन वर्षांपूर्वीचा तिकीट दर ठेवण्यात आला आहे. ही सेवा दि.15 नोव्हेंबरपासून दोन्ही बाजूंनी सुरू करण्यात आली आहे.

शिवाजीनगर येथून दररोज सहा फेऱ्या सुरू केल्या असून तेवढ्याच फेऱ्या नाशिकहून होत आहेत. शिवाजीनगर येथून सकाळी 6.00, 7.00, दुपारी 12.30, 1.30 व सायंकाळी 7.00 व 8.00 वाजता शिवनेरी बसेस सुटतील. तर, त्याच वेळांना नाशिकहून पुण्यासाठी बस सुटणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.