पेठ – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एका कारने अचानक पेट घेतल्यामुळे ही कार जळून खाक झाली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कार चालक बचावला आहे.
माहितीनुसार, पेठ (ता. आंबेगाव) बायपास रस्त्यावर हॉटेल आदित्य तारा जवळ टाटा जेस्ट गाडीने अचानक पेट घेतला. गाडी मालक प्रदीप सोमवंशी (रा. भोसरी) यांना गाडीच्या डॅश बोर्डवर सूचना आल्यानंतर गाडी बाजूला घेतली असता थोडा धुर दिसला. बोनेट उघडल्यावर जाळ बाहेर आला आणि गाडीने प्रचंड पेट घेतला.
हायवेवर गाडी पेटल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती. पेठ येथील पत्रकार आणि मृत्युंजय दुत दिलीप धुमाळ यानी महामार्ग पोलीस आणि मंचर पोलिसांना फोन करून घटनेची कल्पना दिली. याकामी मृत्युंजय दूत अशोक राक्षे पेठचे माजी उपसरपंच अनिल सनस यांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.
घटनास्थळी आळेफाटा महामार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुतनासे यांच्या सुचनेनुसार लगेचच त्यांचे सहकारी दादा मोशे एएसआय आणिप्रकाश मडके एएसआय तसेच मंचर पोलिस स्टेशनचे कर्मचारी राजेंद्र हिले संजय नाडेकर तसच उबाळे हजर होऊन वाहतूक सुरळीतपणे केली.