पुणे – करोना पार्श्वभूमीवर पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाहतुकीदरम्यान गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून या मार्गांवर शिवशाहीच्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे मार्गावर मर्यादित थांबे देऊन प्रवाशांना कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता यावे या अनुषंगाने या मार्गावर वातानुकूलित शिवशाही (आसनी) 9 अतिरिक्त फेऱ्यांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
पुणे-नागपूर मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बस शिवाजीनगरहून (वाकडेवाडी) दुपारी 1, 3, 4, 4.30, 5, 5.30, 6, 6.30, 7, 8.30 सुटणार आहे.