PUNE: अत्याचार प्रकरणात नराधमास २० वर्षे तुरुंगवास

पुणे – धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे तुरूंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावस भोगावा लागणार असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी जाधव यांनी आदेशात म्हटले आहे.
विशाल शशिकांत पाटणे ( वय २५ रा. कन्हेरी ता. खंडाळा, जि .सातारा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपीवर विविध कलमांनुसार राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदार हा फिर्यादीच्या घराच्या शेजारी राहण्यास आहे. त्यांच्याकडे घोड़े असून, ते लग्नकार्यात आणि लग्नाच्या वरातीमध्ये घोडे नाचवतात. आरोपी हा त्यांचा मदतनीस म्हणून काम करतो. त्यावेळी आरोपी हा साक्षीदाराच्या चुलत्याच्या बंगल्यावर मुक्कामाला असायचा. आरोपीने पीडित मुलीला एकांतात गाठत अत्याचार केला.
या गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीणचे उपनिरीक्षक आर. एम. साबळे यांनी केला. अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगट्ट्टी यांनी काम पाहिले. आरोपी हा २७ जून २०२१ पासून कारागृहात आहे. या प्रकरणात पुणे सेशन कोर्ट पैरवी अंमलदार एएसआय विद्याधर निचीत आणि जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पृथ्वीराज ताटे होते.





