धक्कादायक! लहान भाऊ वारंवार पैसे मागतो म्हणून मोठ्या भावाने झोपेतच चिरला गळा; पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे – वारंवार पैसे मागत असल्याने कंटाळून मोठ्याने छोट्या सख्ख्या भावाचा झोपेत असताना गळा चिरून खून केला. ही घटना हडपसर येथील 15 नंबर चौकातील चाळीत घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज शिवाजी गवळी (वय 28, रा. हेमाडेवाडा, हडपसर- मूळगाव हगलुर ता. तुळजापूर) याला अटक केली आहे.

बाबू उर्फ प्रदीप गवळी (वय 23) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसरचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रदीप व मनोज हे भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहत होते. प्रदीप रिक्षा चालवत होता. तर मनोज हा ट्रॅव्हल्स बसेससाठी काम करत होता. प्रदीप मनोजच्या घरी राहत असल्याने ते मनोजच्या पत्नीला आवडत नव्हते.

यामुळे त्यांच्यात वाददेखील व्हायचे. प्रदीपच्या बाहेरख्याली वर्तनामुळे व व्यसनांमुळे मनोज गवळी हा कंटाळला होता. सोमवारी रात्री प्रदीप झोपला असताना मनोजने प्रदीपचा खून केला.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.