Pune | खूनाचे प्रकरण सहा वर्षांनी निकाली, 12 जणांची मुक्तता

पुणे – गोळ्या घालून खून केल्याचा आरोपातून बारा जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासात झालेल्या त्रुटी, आरोपींची ओळ्खपरेड या मुद्यांवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

आबा उर्फ ज्ञानेश्‍वर तांदळे, श्रीधर पवार, नीलेश पिल्ले, शशिकांत जगताप, स्वप्नील बोकड, सतीश पाटील, संतोषकुमार साह, रोहित पवार, चंद्रकांत मराठे, संतोष जांभळे, राजा गुप्ता आणि मंजय साह अशी त्यांची नावे आहेत.

बचाव पक्षातर्फे तर्फे ॲड. ईब्राहिम अब्दुल शेख आणि ॲड. महेश जवर यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. विनायक माने, ॲड. अश्रफ अली अख्तर शेख, ॲड. अफरोज अली ईब्राहिम शेख, ॲड. विजय रेटवडे आणि ॲड. रामदास घोलप यांनी सहाय्य केले.

1 जून 2015 रोजी रोहन राजेंद्र भूरुक हा सोसायटीच्या कार पार्किंग मध्ये असताना त्यांच्यावर गावठी पिस्तुल मधून गोळ्या झाडून जखमी केले. उपचारात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने याबाबत चाकण पोलिसात फिर्याद दिली होती.

त्यानुसार खूनसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल कारण्यात आला. यामध्ये सरकारी पक्षाकडून 32 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य खेड येथील सत्र न्यायाधीश एम एम अंबाळकर यांनी हा आदेश दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.