पुणे : पुणे मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून यंदा विशेष प्रयत्न केले. कृत्रिम हौद, घरच्या घरी गणेश विसर्जन या बरोबरच मुर्तीदान ही संकल्पना राबवण्यात आली. यासोबतच पुणे महापालिकेकडून अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. गणेश मुर्ती दान करा आणि मोफत खत मिळवा असा उपक्रम पालिकेकडून राबवण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील कचऱ्यापासून निर्माण केलेले दोन किलो कंपोस्ट खत मुर्तीदान करणाऱ्यांना मोफत देण्यात आले. या उपक्रमासाठी भूमीग्रीन यांनी पुढाकार घेतला. वृधेश्वर घाट, शिवाजीनगर, पटवर्धन समाधी घाट, कात्रज रॅम्प व येरवडा लुंबीनी उद्यानात सोबत शहरात इतरत्र हा उपक्रम राबवला. वृध्देश्वर घाट व पटवर्धन घाट येथे माझे हस्ते खत वाटप केले गेले. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे यांना मुर्ती दान देण्याची विनंती केली आणि त्या विनंतीस मान देत ती त्यांनी मान्य केली. त्यांनी पुणे मनपात उप आयुक्त म्हणून ही काम केले आहे. तसेच लुंबीनी उद्यानात येथे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी मुर्ती स्वीकारल्या व नागरिकांना खत दिले.