पुणे – महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, ते तातडीने होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांचा तात्पुरता पदभार अद्याप कोणालाही देण्यात आला नाही.
शिवाय राज्याचे करोना उपाययोजना सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, तेही क्वारंटाइन झाले आहेत.
डॉ. भारती यांचा मुलगा आणि पत्नी यांची करोना टेस्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर डॉ. भारती यांनी क्लोज कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे स्वत:ची टेस्ट करून घेतली. त्याचा अहवाल बुधवारी मिळाला.
मात्र, त्यांच्यात करोनाची लक्षणे नाहीत. डॉ. भारती दिवसभर कार्यालयातच होते. अहवाल मिळाल्यानंतर ते लगेचच घरी गेले. ते गृहविलगीकरणात राहणार आहेत.