प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप आज प्रसिद्ध होणार
पुणे – महापालिके आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी झाली. यामध्ये महिलांसाठी 87 जागा लॉटरी पद्धतीने आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या 23 प्रभागांतील 12 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. यामध्ये प्रभाग क्र.20, 50, 48, 8, 27, 9, 11, 7, 37, 38, 1, 42, 26, 22, 10, 39, 21, 47, 46, 19, 4, 12, 3 हे अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत.
या 23 प्रभागांतील 9, 3, 42, 47, 39, 46, 20, 26, 21, 48, 10, 4 या प्रभागातील “अ’ ही जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे.
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभाग 1 आणि 14 पैकी प्रभाग एक मधील “ब’ ही जागा महिलासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे 14 “अ’ ची जागा सर्वसाधारण साठी खुली झाली आहे.
सर्वसाधारण महिलांसाठी देण्यात येणाऱ्या 74 जागांतील उरलेल्या 33 जागांमधून 17 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असतील. यामध्ये 2, 5, 6,15, 16, 17, 18, 23, 24, 25, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 40, 41, 43, 44, 45, 49, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58 या प्रभागांचा समावेश आहे. यात 2, 17, 23, 24, 25, 29, 32, 35, 36, 40, 43, 49, 52, 53, 55, 56, 57 या प्रभागातील सर्वसाधारण महिलांसाठी एकेक जागा आरक्षित असतील.
हरकती-सूचना मागवण्याची मुदत
सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप दि. 1 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या असून, त्यासाठी सहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजेच दि. 1 ते 6 जूनच्या दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती-सूचना नागरिक दाखल करू शकतात. या हरकती सूचना महापालिकेतील आयुक्त कार्यालय, सावरकर भवनमधील निवडणूक कार्यालय तसेच सर्व 15 क्षेत्रीय कार्यालये याठिकाणी स्वीकारल्या जातील. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी लिखित स्वरूपात त्या दाखल कराव्यात, असे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.