ऑक्‍सिजनसाठी पुणे पालिकेचीही ‘दमछाक’

दररोज गरज 50 टनांची, मिळतोय 41 टन प्राणवायू

पुणे – महापालिकेच्या कोविड रुग्णालयात सध्या रोज 41 टनच ऑक्‍सिजन मिळत असून, आपली आवश्‍यकता प्रतिदिन 50 टनाची आहे. त्यामुळे ते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी सांगितले.

महापालिकेची सात रुग्णालये आहेत आणखी एक रुग्णालय आता वाढणार आहे. या सगळ्या रुग्णालयांमध्ये मिळून दररोज 50 टन ऑक्‍सिजन लागतो. सध्या तो दररोजच 41 टन मिळतो. त्यामुळे त्याचा तुटवडा आहे. विभागीय आयुक्‍तांकडे अतिरिक्‍त ऑक्‍सिजनची मागणी केली आहे, असे डॉ. खेमनार म्हणाले.

याशिवाय ऑक्‍सिजन बनवणाऱ्या तीन कंपन्यांशी महापालिकेने स्वत:च्या पातळीवरही संपर्क केला आहे. याशिवाय आरटीओकडून दोन टॅंकरला मंजुरी मिळाली असून, एकची प्रक्रिया सुरू असल्याचे डॉ. खेमनार म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.