पुणे महापालिका करणार ऍम्युनिटी स्पेसचा कमर्शियल वापर

पुणे-मालकीच्या सदनिका विक्रीबरोबर महापालिका स्वत:च्या ऍम्युनिटी स्पेसचा कमर्शियल वापर करण्याच्या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे. भविष्यात उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरेल असे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांवर मर्यादा आली आहे. त्यातून करोनाच्या संकटामुळे यावर्षीच्या विकास कामांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत धुंडाळले जात आहेत. यामध्ये महापालिकेच्या मालकीच्या 10 हजार सदनिकांपैकी 3 हजार ताब्यात आहेत. त्यातील दीड हजार सदनिका विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचप्रकारे ऍमिनिटी स्पेसचाही वापर करून उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संपूर्णत: कमर्शियली त्याचा उपयोग केला जाणार आहे. या जागांवर अतिक्रमणे होतात तसेच त्या जागांवर खास सुरक्षारक्षक नेमावे लागतात, त्याल कुंपण घालावे लागते, त्याचाही खर्च अधिक होतो. त्यापेक्षा त्याचा वापर मंगल कार्यालये, किंवा छोटे-मोठे कार्यक्रम करण्यासाठी करता आले तर उत्पन्न मिळू शकेल, असे रासने यांचे म्हणणे आहे. येत्या वर्षांत ही आर्थिक घडी बसवणे अत्यंत आवश्‍यक असल्याने या जागांचा अशाप्रकारे वापर केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.