पुणे – महापालिकेला देणगीदाखल मिळालेल्या “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ची लायब्ररी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून गरजू रुग्णांना ते वापरण्यासाठी देण्यात येणार आहे.
अनेक रुग्ण करोनातून बरे झाले आहेत; परंतु त्यांची ऑक्सिजन लेव्हल अजूनही स्थिर होत नसेल तर त्यांना घरीच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लावण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो, अशा रुग्णांना भाडे तत्त्वावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणावे लागतात. तसेच,
महापालिकेकडे देणगीदाखल अनेक कॉन्सन्ट्रेटर आले आहेत. त्या कॉन्सन्ट्रेटरचा वापर गरजू रुग्णांसाठी होऊ शकतो. त्यामुळे ही लायब्ररी सुरू करण्यात आल्याचे महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.
7, 15 किंवा 30 दिवस विविध क्षमतेचा म्हणजेच 5, 10 लिटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरायला देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट, डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्याला सांगितला आहे त्याची संपूर्ण माहिती, महापालिकेने दिलेल्या नमुन्याप्रमाणे रुग्णाचे हमीपत्र, रुग्णाचा पुराव्यासह संपूर्ण पत्ता, इलक्ट्रिक बिल, आधार कार्ड अनिवार्य असणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी समन्वयक राहुल वडगाये यांना 9881190696 या क्रमांकावर किंवा सेंट्रल मेडिकल स्टोअर, गाडीखाना याठिकाणीही संपर्क करता येणार आहे.