पुणे- कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत म्हणून महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2 कोटी 1 लाख रुपयांचा धनादेश महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, उपमहापौर सुनीता वाडेकर , विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. रजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त सुनील इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, पीएमसी एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष प्रदीप महाडिक, आशीष चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.