पंतप्रधानाकडून महापालिकेचा गौरव

कर्जरोखे उभारणीसाठी विशेष पुरस्कार

पुणे – समान पाणी पुरवठा योजनेसाठी काढलेल्या “म्युन्सिपल बॉन्ड’ संकल्पनेसाठी महापालिकेला विशेष पुरस्कार देऊन शुक्रवारी गौरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त शितल उगले आणि मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी नवी लखनौ येथे हा पुरस्कार स्वीकारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना आणि पंतप्रधान आवास योजनेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्येमंत्री हरदीप सिंग पुरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप माजी आयुक्त आणि स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार उपस्थित होते. याशिवाय, महापालिकेकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्मार्ट गव्हर्नन्स अंतर्गत सुरू केलेल्या “पीएमसी केअर’ या तक्रार निवारण प्रणालीचीही केंद्राकडून विशेष दखल घेण्यात आली. त्यासाठीही विशेष पुरस्कार देण्यात आला. पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, आयटी विभागाचे प्रमुख राहूल जगताप, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने या परिषदेत सहभागी झाले होते.

समान पाणी योजनेसाठी सुमारे 200 कोटींचे कर्जरोखे महापालिकेने उभारले आहेत. असा प्रयत्न करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेत स्वयंशाश्‍वत महापालिका म्हणून महापालिकेस या कर्जरोख्यावर 26 कोटींची सबसिडी केंद्र सरकारने दिली आहे. ही पुणेकरांसाठी गौरवाची बाब आहे.
– मुक्ता टिळक, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)