संवेदनशील विषयांचे राजकारण नको- महापौर

पुणे – मराठा समाजाला आरक्षण मिळावी, हीच भाजपची भूमिका आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असून तो मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अशा संवेदनशील विषयांबाबत राजकारण केले जाऊ नये, अशा शब्दांत महापौर मुक्‍ता टिळक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सलग दोन दिवस सभागृहात झालेल्या गोंधळानंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, हा विषय संवेदनशील आहे, मराठा आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे. त्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेत आहे. हा विषय महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही. सभासदांना जागेवर बसण्याची विनंती केली होती. त्यानंतर बोलण्याची संधी देणार होते. मात्र विरोधी पक्षाचे नगरसेवक ऐकत नव्हते. त्यांना स्टंटबाजी करायची होती. आरक्षणाचा हा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने राजकीय चर्चा होणे अपेक्षित नाही. ही बाब लक्षात घेऊनच सभागृहाचे निर्णय घेतले जात आहेत. समाजातील वातावरण बिघडू नये, म्हणून तोडफोड करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार नाही. मात्र, भविष्यात असे प्रकार केल्यास ही बाब गांभीर्याने घेतली जाईल, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)