महापालिकेला दिलासा; विस्तारीत इमारत सुरक्षित

“सीओईपी’चा अहवाल : मानकांप्रमाणेच बांधकाम झाल्याचा निर्वाळा

पुणे – उद्‌घाटनादिवशीच उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांसमोर विस्तारीत इमारतीच्या गळतीमुळे अडचणीत आलेल्या महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. या नवीन इमारतीच्या सभागृहाचा डोम आणि बांधकाम सुरक्षित असल्याचा निर्वाळा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने (सीओईपी) दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इमारत गळतीनंतर प्रशासन तसेच इमारतीच्या उद्‌घाटनासाठी घाई करणाऱ्या भाजपवर टीका झाल्याने प्रशासनाने या इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची विनंती “सीओईपी’ला केली होती. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

या इमारत बांधकामांसाठी वापरलेल्या साहित्यांपासून प्रत्येक टप्प्यावर केलेल्या बांधकामाची माहिती, त्यासाठी वापरलेले साहित्य, त्यांची तपासणी केलेले अहवाल, बांधकामासाठी दिलेला वेळ ही माहिती “सीओईपी’ला देण्यात आली होती. तसेच इमारतीच्या बांधकामाचे नमुनेही घेण्यात आले होते. दरम्यान, या इमारतीच्या इतर काही घटकांची तपासणीही “सीओईपी’ने केली असून त्यानुसार आवश्‍यक उपाययोजनांचा तसेच इतर सूचनांसह अंतिम अहवाल “सीओईपी’कडून पुढील दहा दिवसांत महापालिकेस देण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

काय आहे अहवालात?
सार्वजनिक वापरासाठी असलेले बांधकामांचे निकष पाळण्यात आले आहेत.
इमारतीच्या बांधकामाचे नकाशे योग्य पद्धतीने तपासले आहेत.
प्रत्यक्ष बांधकाम आणि नकाशांमध्ये काही ठिकाणी केले आहेत बदल.
गळती झालेल्या डोमची रचना तसेच संबंधित बांधकाम वापरासाठी सुरक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)