पुणे – महापालिका होतेय करोना “हॉटस्पॉट

पुणे – शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा आहेत. तर,बाहेरील व्यक्‍तींना बंदी घालण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्तांनीच तसे आदेश काढले आहेत. पण, महापालिकेत दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांची गर्दी दररोज वाढत आहे. पालिकेतच अनेक जण विनामास्क फिरत असून कोणतेही सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे महापालिकेची मुख्य इमारतच करोना प्रसाराची “हॉटस्पॉट’ असल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊन काळात शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 15 टक्‍क्‍यांवर आणण्यात आली आहे. शिवाय, बाहेरील व्यक्‍तीला येथे प्रवेश करायाचा असेल, पास घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, महापालिकेतच या नियमाला हरताळ फासला जात आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीत सरसकट प्रत्येकाला प्रवेश दिला जात असल्याने अनेक विभाग प्रमुखांच्या कार्यालयात गर्दी वाढत आहे. त्यात प्रामुख्याने बांधकाम विभाग, दोन्ही अतिरिक्त आयुक्तांची कार्यालये तसेच आरोग्य विभागाचा समावेश आहे.

यात अनेक जण विनामास्क फिरत असून आरोग्य विभागात येणारे अनेक जण बाधित किंवा सौम्य लक्षणे असतानाही या व्यक्‍ती घरातील इतर व्यक्‍तींच्या उपचार तसेच औषधांसाठी शहरी गरीब योजनेची पत्र अथवा इतर आरोग्य विषयक कामासाठी येत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.