अत्यावश्‍यक सेवा वगळून मतदानादिवशी पुणे महापालिकेला सुट्टी

पुणे – महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी मतदानादिवशी महापालिकेला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्‍यक सेवा वगळून ही सुट्टी जाहीर करण्यात आली असून या सेवांमधील कर्मचाऱ्यांना मतदानाला जाण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.

महापालिकेचे शहरात सुमारे साडेसतरा हजार कर्मचारी असून ठेकेदारी पद्धतीने सुमारे 10 हजार कर्मचारी वेगवेगळ्या विभागांत कार्यरत आहेत. त्यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. पुण्यात येत्या मंगळवारी ( दि.23) रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, महापालिकेतील अनेक कर्मचारी हे शिरूर तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील रहिवासी असल्याने तसेच त्यांचे मतदान येत्या 29 एप्रिल रोजी असल्याने या कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला सुट्टी जाहीर करण्यात आली असली, त्या दोन्ही लोकसभा मतदारासंघात मतदानासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रजा टाकून आपला मतदानाचा हक्क बजवावा लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.