पुणे-मुंबई ‘बीआरटी’ बस चाचणीत चुकांची पुनरावृत्ती

दापोडी-निगडी मार्ग : चाचणीचा अहवाल न्यायालयापुढे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये बुधवारी (दि. 25) बसची चाचणी घेण्यात आली. यामध्ये बस थांब्यांचे दरवाजे न उघडण्याच्या चुकांची पुनरावृत्ती झाली. मात्र, या तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतर या मार्गावरील बस चाचणी यशस्वी पार पडली. या चाचणीचा अहवाल उद्या (दि. 26) महापालिका प्रशासन उच्च न्यायालयात सादर करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चाचणी झाली. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता महापालिका मुख्यालयाजवळील बस थांब्यावरून या चाचणीला सुरुवात झाली. मात्र, चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्याने वाहतूक पोलिसांनी चाचणीला रेड सिग्नल दाखवला. अखेर कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दीड तास विलंबाने प्रत्यक्षात चाचणीला सुरुवात झाली. याचिकाकर्ते अॅॅड. हिम्मतराव जाधव, बीआरटीएसचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, बीआरटीएस व्यवस्थापक सुनील गवळी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एकनाथ पाटील, दीपक पाटील, उपअभियंता संजय साळी, निगडी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरिक्षक संजय जाधव, भोसरी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आर. एन. पाटील, चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक यू. एन. लोंढे आदींच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.

गेल्या वेळी घेतलेल्या बस चाचणीमध्ये बीआरटीएस बस थांब्यांचे दरवाजे उघडण्याची तांत्रिक अडचण जाणवली होती. त्यामध्ये आयआयटी पवईकडून मिळालेल्या सूचनेनुसार सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी पुन्हा या मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये “आरएफआयडी टॅग’ न जुळल्याने काही बस थांब्यांचे दरवाजे उघडले नाहीत. मात्र, चालकाने बस मागे-पुढे घेतल्याने हा “टॅग’ जुळला आणि हे दरवाजे उघडले. याशिवाय पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असलेल्या सिग्नलची देखील यावेळी चाचणी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)