“एक्‍स्प्रेस-वे’वरील अपघात रोखण्याचे प्रयत्न

File photo

दर तीन महिन्यांनी घेणार वाहतुकीचा आढावा : गृह अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत समिती

– आवश्‍यक उपाययोजनांसाठी शिफारशींवर चर्चा करणार

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पुणे-मुंबई महामार्ग द्रुतगती मार्गावरील (एक्‍स्प्रेस-वे) अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच अपघातांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना सूचविण्यासाठी शासनाने 13 जणांची सुकाणू समिती नेमली आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा आढावा घेऊन त्यानुसार आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबधित विभागांना देणार आहे.

पुणे-मुंबईला जोडणारा द्रुतगती मार्ग हा महत्त्वाचा रस्ता आहे. द्रुतगती मार्गामुळे पुणे-मुंबई असा प्रवास करण्यासाठीचा वेळ वाचला आहे. या द्रुतगती महामार्गावर अनेक अपघात झाले आहे. यामध्ये प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगमर्यादा न पाळणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, सुरक्षेसाठी सीटबेल्ट न लावणे, वहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन तोडणे, इंडिकेटरचा वापर न करणे अशा अनेक कारणांमुळे या महामार्गावर अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर द्रुतगती मार्गावरील अपघातांना आळा घालण्याकरिता अपघातांची शास्रशुध्द माहिती जमा करणे, तिचे विश्‍लेषण करून अपघातांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने आवश्‍यक ती उपाययोजना करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गृह विभाग व दिल्ली येथील सेव्ह लाईफ फाउंडेशन यांच्यामध्ये जून 2018 मध्ये सामंजस्य करार झालेला आहे. या सामंजस्य करारातील तरतूदींनुसार प्रकल्पाच्या नियंत्रणाकरिता गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

द्रुतगती मार्गावरील अपघात टाळण्याच्या दृष्टीने मार्गावरील वाहतूक नियमांचे पालन होण्यासंदर्भात आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी सेव्ह लाईफ फाउंडेशनने सादर केलेल्या शिफारशींवर चर्चा करून योग्य ते आदेश संबधित विभागांना देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)