पुणे आणि मुळशी बाजार समितीचे विभाजन

पुणे – पुणे आणि मुळशी बाजार समितीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मिलींद सोबले यांनी याबाबतचे आदेश गुरुवारी जारी केले.
त्यानुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत हवेली तालुका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द, खडकी, पुणे, देहूरोड कटक मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. मुळशी तालुक्‍यासाठी मुळशी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात आली आहे. मुळशी बाजार समितीचे बाजार आवार ताथवडे येथे निश्‍चित करण्यात आले आहे. मुळशी बाजार समितीत मुळशी तालुक्‍यातील 147 गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य बाजार श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथे राहणार आहे. पिंपरी-चिंचवड, खडकी, उत्तमनगर, मांजरी, मोशी हे उपबाजार राहणार आहेत. मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांची भरती नव्याने करावी लागणार आहे. पुणे बाजार समितीतील कर्मचारी तेथे वर्ग केले जाणार नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.