हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार शहराध्यक्ष व माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे नागरिकांचा वाढता कल आहे. जुने चेहरे आणि त्याच-त्याच लोकांकडे मतदार संघाची सत्ता देण्याएवजी नवा पर्याय म्हणून बाबर यांना पाठिंबा वाढत असल्याचा विश्वास मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या पदयात्रेस महादेववाडी व परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो युवक व स्थानिक नागरिकांनी या पदयात्रेत व बाईक रॅलीत स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला.
ही पदयात्रा विठ्ठल रुक्मिणी मंदिर, भैरवनाथ मंदिर बौद्ध विहार येथून सुरू होऊन पुढे आनंद नगर, घुले नगर, पिरवाडी, कृष्णा नगर, गणेश नगर, आशीर्वाद पार्क, पोस्टमन कॉलनी, तरवडे वस्ती, राजीव गांधी नगर, साठे नगर, संकेत पार्क, वाडकर मळा, सिद्धिविनायक कॉलनी, अखिल हरिहरेश्वर नगर, नवरात्र नगर, ससाणे वस्ती, आदर्श कॉलनी, चिंतामण नगर, सुभाष पार्क, उद्योग नगर, गंगा विलेज, श्रीराम चौक, सातव नगर, आझाद हिंद कॉलनी, इंद्रायणी नगर, हांडेवाडी रोड, गार्डन गेट आदी परिसरात निघाली.
यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे साईनाथ बाबर यांना औक्षण करीत फटाक्यांच्या आतिषबाजीत फुलांची उधळण करीत जोरदार स्वागत केले. यावेळी अध्यक्ष सुनील घुले, गोकुळ घुले, आनंद घुले, श्रीकांत घुले, बाळासाहेब घुले, दत्ताभाऊ घुले, जयसिंग जगदाळे व मोठ्या संख्येने महादेव वाडी येथील नागरिक उपस्थित होते.
पाच वर्षांत काय केले ते पाहिले…
हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून जीवघेणी वाहतूक कोंडी, पाणी समस्या, कचरा, आरोग्य शिक्षण आदी समस्यांनी त्रस्त आहेत. गेल्या पाच-दहा वर्षांत निवडून आलेल्यांनी काय विकास केला तो सर्वांनीच पाहिला आहे. या समस्या सोडवण्यासाठीच आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत. तुम्हा सर्वांची साथ मिळाली तर हडपसर मतदार संघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्वास साईनाथ बाबर यांनी व्यक्त केला.