पुणे : – पुणे महापालिका येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत लावलेला हिंदी भाषेतील मजकुरातील बोर्ड मराठीतून करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने सोमवारी (दि. 4) आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी नीलेश प्रकाश निकम यांच्यासह कुणाल हेंद्रे, सुभाष माने, अनिल पवार, रंजीत माने, गणेश शिंदे, कृष्णा जाधव, अजय झडपे, विकी कुसाळकर, गणेश जोशी, साहिल कंट्रोल, संदेश जोशी, दीपक तुसम यांच्यासह मोठ्या संख्येन मनसैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्राची मराठी ही मातृभाषा आहे. मराठी बोलणाऱ्यांचा विचार केल्यास ही देशातील तिसरी आणि जगातील दहावी भाषा आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. येथील महापालिकेतील बॅंकेत मराठी बोर्ड नसणे योग्य नाही. त्यामुळे हिंदीतील बोर्ड काढून मराठी लावण्याबाबत बॅंक आणि शिवाजीनगर पोलिसांना निवेदन देण्यात आले होते.
तरीही हिंदीतील बोर्ड न काढल्याने मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान लवकरच हिंदीतील बोर्ड काढून मराठीत लावण्याबाबतचे पत्र बॅंकेने दिल्याचे नीलेश निकम यांनी सांगितले.