पुणे – आता मिशन; अकरावी अॅडमिशन

पुणे – शहरातील अकरावी प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची संकेतस्थळावर नोंदणी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी नोंदणीसाठी संकेतस्थळावर माहिती भरून, ती दि. 10 मे पर्यंत एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर येथे संपूर्ण फाइल सादर करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिल्या आहेत.

अकरावी ऑनालाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावरील आपल्या महाविद्यालयाची माहिती कॉलेज प्रोफाइलमधील सन 2019-20 वर्षातील सर्व माहिती तपासून घ्यावी. त्यानंतर किरकोळ बदल असल्यास तसे पत्र फाइलमध्ये सादर करावे. त्याप्रमाणे नोंदणी लिंकवर कॉलेज स्तरावरून हे बदल करावेत. मागच्या शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेल्या माहितीमध्ये जर नवीन तुकडी, शाखा, शुल्क यात बदल करावयाचा असल्यास, तसा स्वतंत्र प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे आवश्‍यक आहे. त्याची मान्यता मिळाल्यानंतर हे बदल मुख्य केंद्रावर करता येणार आहे.

नवीन मान्यता मिळालेले महाविद्यालयांनी गतवर्षी नोंदणी नसलेल्या व नव्याने मान्यता मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्‍यक त्या सर्व कागदपत्रासह मुख्य केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याबाबतचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी प्रसिद्ध केले आहे. विभागनिहाय सर्व महाविद्यालयांनी एस. एम. जोशी महाविद्यालयात दिलेल्या वेळेत माहिती सादर करणे आवश्‍यक आहे, असे शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी म्हटले आहे.

महाविद्यालयांना विभागनिहाय नोंदणीसाठी वेळापत्रक
* पुणे शहर विभाग : 6 मे
* कर्वेनगर-कोथरूड विभाग : 7 मे
* पर्वती, धनकवडी, स्वारगेट : 8 मे
* कॅम्प, येरवडा आणि हडपसर विभाग : 8 मे
* शिवाजीनगर, औंध, पाषाण विभाग : 9 मे
* पिंपरी, भोसरी, चिंचवडी, निगडी विभाग : 9 मे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.