पुणे-मिरज “डबलिंग’ही सुपरफास्ट

16 किलोमीटर दुहेरीकरण

पहिल्या भागामध्ये शेणोली ते भवानीनगर आणु ताकारी स्थानकादरम्यान 16 किलोमीटरदरम्यान दुहेरीकरण झाले आहे. पुणे ते मिरजदरम्यान रेल्वे मार्गाचे बहुप्रतिक्षित दुहेरीकरणाच्या (लाइन डबलिंग) कामातील पहिला टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण होताच या मार्गावरील गाड्यांची संख्यादेखील वाढणार असून प्रवाशांच्यादृष्टीने हा मोठा दिलासा ठरणार आहे.


पुणे –
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे ते मिरज मार्गावरील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. या मार्गावरील वेगवेगळ्या भागात हे काम करण्यात येणार असून त्यातील पहिला भाग शेणोली ते ताकारी स्थानकादरम्यानचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी स्थानकावर आवश्‍यक तांत्रिक कामे करण्यात आली आहेत. 

अडीच वर्षांत काम
उर्वरित मार्गावरील काम येत्या अडीच ते तीन वर्षामध्ये पूर्ण होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पॅनल बोर्डवरून नियंत्रण
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हिज्युअल डिस्प्ले युनिट्‌स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पॅनल बोर्डवरून रेल्वे गाड्यांचे नियंत्रण केले जाणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.

वेळेची होणार बचत सध्या पुणे ते मिरज या
280 किलोमीटर अंतर असणाऱ्या एकेरी रेल्वे मार्गावर प्रवासासाठी तब्बल सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. त्याचबरोबर रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबल्यास प्रवाशांचा नाहक वेळ वाया जातो. पण, दुहेरी मार्गामुळे गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबण्याची गरज राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.