मिनी मॅरेथॉन स्पर्धा : कोंकर, कौसदीकर, करमरकर व पंत यांना विजेतेपद

पुणे – अनुराग कोंकर, राधा कौसदीकर, सुखदेव सिंग, अँजेला पंत, तन्मया करमरकर या धावपटूंनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकाविला आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्‍लब यांच्या तर्फे आयोजित केलेल्या सहाव्या एनआयओ व्हिजन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.

या स्पर्धेतील विविध गटात तीन हजार धावपटूंनी भाग घेतला. त्यामध्ये एक हजार खेळाडू “ब्लॉईंड फोल्डेड” स्वरूपात सहभागी झाले होते. नोंदविला होता. अर्ध मॅरेथॉन शर्यतीच्या (21 किलोमीटर) पुरूष खुल्या गटात पुण्याच्या कोंकर याने एक तास 24 मिनिटे 26 सेकंद वेळ नोंदविली. अमजद शेख व विश्वासकुमार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. महिला खुल्या गटात कौसदीकर हिने 2 तास 2 मिनिटे 21 सेकंद वेळ नोंदविली. दीप्ती कोलारने दुसरा व ऐश्वर्याकुमारी हिने तिसरा क्रमांक पटकावला. पुरूष वरिष्ठ गटात दिनेश याने 1 तास 34 मिनिटे 37 सेकंद वेळ नोंदवून विजेतेपद पटकावले. तर महिला गटात तन्मया करमरकर हिने 1 तास 44 मिनिटे 16 सेकंद वेळ नोंदवत प्रथम स्थान पटकावले.

पुरूष वरिष्ठ गटातील 10 किलोमीटर शर्यत सुखदेव सिंगने 46 मिनिटे 52 सेकंदात अंतर पूर्ण करून विजेतेपद पटकावले. महिला गटात अँजेला पंतने 58 मिनिटे 1 सेकंद वेळ नोंदवून विजेतेपदाला गवसणी घातली.

स्पर्धेचा मार्ग रवींद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्‍सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ झाला आणि औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्‍सलेन्स, बाणेर असा मार्ग होता. स्पर्धेचा प्रारंभ नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑप्थेलमॉलजी (एनआयओ) चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण डॉ आदित्य केळकर व जाई केळकर, रवींद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्‍सलेन्सच्या मुख्याध्यापिका जमुना गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रनबडिज्‌ क्‍लबचे निखिल शहा उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

10 किलोमीटर : पुरूष खुला गट: 1. एस. शिखर 34 मिनिटे 51से; 2.सारांश रॉय 39 मिनिटे 3 से, 3.अमित शिवकंद 39 मिनिटे 31 से.

महिला खुला गट : 1. तान्या दकवर्थ 50 मिनिटे 36 सेकंद, 2.हरिका 51 मिनिटे 16 से; 3.पूर्वीकुमारी 51 मिनिटे 19 से.

पुरूष वरिष्ठ गट: 1.सुखदेव सिंग 46 मिनिटे 52 से, 2.मोहन बुनिया 47 मिनिटे 55 से, 3.महादेव घुगे 48मिनिटे 2 से.

महिला वरिष्ठ गट : 1.अँजेला पंत 58 मिनिटे 1 से, 2.मृणालिनी पिंपरीकर 1 तास 3 मिनिटे 54 से, 3.राधिका श्रीनिवासन 1 तास 6 मिनिटे 1 से.

पुरूष वरिष्ठ गट: 1.दिनेश 1 तास 34 मिनिटे 37 से, 2.आशिष पुणतांबेकर 1 तास 34 मिनिटे 56 से, 3.सुभोजीत रॉय 1 तास 36 मिनिटे 49से.

महिला वरिष्ठ गट: 1. तन्मया करमरकर 1 तास 44 मिनिटे 16 से, 2.कविता रेड्डी 1 तास 48 मिनिटे 21 से, 3.नीला पंचपोर 2 तास 6 मिनिटे 27 से.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)