पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन आज पार पडले. यामध्ये ‘वनाज ते रुबी हॉल’ आणि ‘सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय’ या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुसह्य होणार आहे. यावेळी राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते गरवारे कॉलेज ते रुबी हॉल तसेच फुगेवाडी ते शिवाजी नगर सिव्हील कोर्ट या दोन विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाले. यापूर्वी वनाझ ते गरवारे कॉलेज या मार्गाच आणि पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाचं उद्घाटनं वर्षभरापूर्वी मोदींच्याच हस्ते झाले होते.
यामध्ये वनाज ते सिव्हिल कोर्ट हा 8 किमीचा मार्ग आहे. या मार्गावरचा 22 मिनिटांचा प्रवास असेल. तर पिंपरी ते सिव्हील कोर्ट हा 25 किमी चा प्रवास आहे. मात्र, या मेट्रोचा प्रवास आणि मार्ग कोणते असतील? मेट्रोचे तिकीट आणि वेळ काय असणार आहे? याबाबत सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
मेट्रोचा वेळ काय असणार ?
सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत.
गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत.
12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.
तिकीट कसे मिळणार ?
प्रवाशांना मेट्रोने प्रवास करण्यासाठी तिकीट रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर मिळेल. स्थानकावर तिकीट व्हेडिंग मशीन आहेत. त्याद्वारे डेबिट किंवा क्रेडीट कार्डच्या माध्यमातून तिकीट मिळणार आहे.
मेट्रोचे महाकार्ड किंवा पुणे मेट्रोच्या ॲपमधून तिकीट घेता येईल. ज्यांना व्हॉट्सॲपवरुन तिकीट हवे असेल त्यांनी 9420101990 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. या क्रमांकावर hi मेसेज केल्यावर तिकीट पर्याय येईल. त्यानंतर पेमेंट केल्यावर क्यूआर कोड मिळेल.
पुणे मेट्रोचे तिकीट दर
वनाझ ते रूबी हॉल ₹25
पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट ₹30
वनाझ ते पिंपरी चिंचवड ₹35
रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड ₹30
वनाझ ते डेक्कन जिमखाना ₹20
पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन ₹30
पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना ₹30% सवलत
शनिवार रविवार सर्वांना ₹30% सवलत
दगडूशेठ चरणी पंतप्रधान नतमस्तक
देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.