पुणे- गेल्या काही महिन्यापासून पुण्यात मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रो कशी असेल, हे पाहण्यासाठी पुणेकर चांगलेच उत्सुक आहेत.
प्रत्येक शहरातील मेट्रोला एक विशेष नाव देण्यात आले आहे. पुण्याच्या मेट्रोला महा मेट्रो असं नाव दिलं आहेत तर नागपुरच्या मेट्रोला माझी मेट्रो असं नाव दिले आहे.
दरम्यान, पुणे मेट्रो दोन मार्गावर धावणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी असे या मेट्रोचे मार्ग आहेत. मेट्रोच्या कोचमध्ये 50 लोकं बसू शकतात 250 लोकं उभी राहू शकतात एकावेळी 900 लोकं प्रवास करू शकतात AC आणि wifi ची सुविधा आहे