पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण

पुणे(प्रतिनिधी)  : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः महापौर यांनी ट्विटर वर या बाबत माहिती दिली आहे.

ताप येऊ लागल्याने महापौरांनी करोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आपली प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी कळविले आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

Posted by Digital Prabhat on Saturday, 4 July 2020

ट्विटरवर याबाबत माहिती देताना पुढे त्यांनी म्हटले आहे की, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.