पुणे – येत्या गुरूवारी (१५ ॉगस्ट) स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी दरवर्षी मार्केट यार्ड व उपबाजार बंद असतात. त्यानुसार यंदाही मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळ-भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग, केळी आणि गुरांचा बाजार, गुळभुसार विभाग, स्थापत्य विभाग, भांडार शाखा, छपाई लेखनसामुग्री, भुईकाटा केंद्र, पेट्रोप पंप, फुल बाजार, पान बाजार, माती परिक्षण व अन्न भेसळ प्रतिबंधक प्रयोगशाळा, तसेच मोशी, मांजरी, उत्तमनगर व खडकी येथील उपबाजार बंद राहणार आहेत.
याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, शेतीमाल विक्रीस आणू नये, ग्राहकांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब तावरे यांनी परिपत्रकच्या माध्यमातून केले आहे.