हडपसर – केंद्रात महायुतीचे सरकार आहे. राज्यातही महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आम्हा तिघांवर विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे आम्हीं तिघे एकत्र काम करून मागील ४० वर्षांत जे घडले नाही, असे काम पाच वर्षात करून दाखवू. महायुतीकडे हडपसरच्या विकासाचे व्हिजन आहे, त्यामुळे चेतन तुपे यांना विजयी करा, असे आवाहन आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
माळवाडी रोड येथे विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह समोर आयोजित विकास संकल्प सभेत टिळेकर बोलत होते. यावेळी महायुतीचे शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, गोपाळराव म्हस्के, माजी महापौर वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, उज्वला जंगले, माजी नगरसेवक मारुती तुपे, फारुक इनामदार, अशोक कांबळे, उल्हास तुपे, महादेव दंदी, नंदा लोणकर, सुरेखा कवडे, सुभाष जंगले, संदीप दळवी, भूषण तुपे, संदीप लोणकर, सुनिल बनकर, जीवन जाधव, शिवराज घुले, आण्णा धारवाडकर, नाना म्हस्के, बाळासाहेब कोद्रे, वासंती काकडे, विजया वाडकर, नंदू घुले, नितीन होले, डॉ. शंतनू जगदाळे आदी उपस्थित होते.
“विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाहीत. काय करणार ते सांगत नाहीत. याउलट मतदार संघात आमदार योगेश अण्णा, शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना आणि आम्ही महायुतीचे सर्वच जण हडपसरच्या विकासाचे व्हिजन घेऊन समोर आलो आहोत.” – चेतन तुपे, महायुतीचे उमेदवार
“हडपसरमध्ये विकासाची गंगा योगेश आण्णा आणि चेतन पाटील दोन आमदारांनी आणली आहे. यापुढेही ही विकासाची गती अशीच ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांना विजयी करावे.” – प्रमोदनाना भानगिरे, शिवसेना शहर प्रमुख
आमदारांच्या डोळ्यात अश्रू…
पहिली निवडणूक २००७ ला घड्याळ चिन्हावर लढवली. घड्याळ कधी सोडले नाही. मी आहे तेथेच आहे. मतदार संघात माझी गोरगरीब जनता ही गल्लीबोळात राहत आहे. त्यामुळे मी गल्लीबोळात काम करतो. सर्वसामान्य लोकांत राहून मी जर सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत असेल तर माझं नेमकं काय चुकलं. विरोधक काय म्हणतात याची फिकीर नाही. मी गरिबांच्या दारात जावून काम करेल ,असे सांगताना महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांच्या डोळ्यांत अश्रू आले.