फुरसुंगी – राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून भेकराई नगर येथील महाराष्ट्र बँकेमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. बँकेमध्ये एकाच काउंटरला केवायसी देणे, बँक पुस्तक भरून देणे व बाकीचे सर्व काम दोन नंबर काउंटरला होते यामुळे इतर काउंटर मोकळे राहतात व तेथील कर्मचारी चहा घेण्यासाठी अर्धा-अर्धा तास लावतात, जेवण करण्यासाठी एक-एक तास लावतात तोपर्यंत खातेदारांना रांगेमध्येच उभे राहावे लागते, याबाबत बँक व्यवस्थापनाकडे अनेकांनी तक्रार केली आहे.
परंतू, त्यानंतरही कोणतीही उपाययोजना राबविण्यात येत नाही. यामुळे बँकेच्या खोतदारांचे हाल होत आहेत. दररोज तीन ते चार तास थांबूनही काम होत नसल्याने नागरिक त्रस्त होत आहेत. गरीब कुटुंबातील सामान्य नागरिकांना रांगेत थांबण्याशिवाय पर्याय नाही.
बँकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून एक काउंटर ऐवजी दोन काऊंटर सुरू करावेत. अशी जोरदार मागणी केल्यानंतर दोन काउंटर सुरू करण्यात आले. परंतु, शाखा प्रशासनेही ग्राहकांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या पाहिजेत, असे सामाजिक कार्यकर्ते रमेश आप्पा निवंगुणे यांनी सांगितले.