पुणे : कमी उंचीचे दुभाजक धोकादायक

वानवडी – वानवडीतील शिवरकर रस्त्यावरील महाराष्ट्र बॅंक ते शिवरकर गार्डनपर्यंत असलेल्या कमी उंचीच्या दुभाजकांवर वाहने जाऊन अपघात होत आहेत.

महाराष्ट्र बॅंकेसमोर असलेल्या कमी उंचीच्या दुभाजकावर रात्रीच्या वेळी वाहने जात असून अशा अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

या ठिकाणी पथदिव्यांच्या अपुऱ्या प्रकाशामुळे तसेच रिफ्लेक्‍टर नसल्याने कमी उंचीचे दुभाजक चालकांना दिसत नाहीत, त्यामुळे वाहने दुभाजकाला धडकून अपघात होत आहेत.

फातिमानगर चौकातही तुटलेले दुभाजक काढल्यानंतर बीआरटी मार्गासाठी लावण्यात आलेले सिमेंटचे दुभाजक येथे लावण्यात आले; परंतु या दुभाजकांची उंचीही कमी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.