पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस करोनाची संख्या वाढताना दिसत आहे. करोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
१३ ते २३ जुलै पुणे आणि पिंपरी शहरात संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. शहरात २ टप्प्यात लॉकडाऊन असेल, पहिले पाच दिवस फक्त औषधे, दूध आणि वृत्तपत्रे सुरू राहणार असून संपूर्ण कडक लॉकडाऊन असणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात १८ ते २३ अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ उघडणार त्यात, किराणा आणि भाजीपाला समावेश असेल. दहा दिवसांत टेस्टिंग वेगाने वाढणार असून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू घेऊन ठेवाव्या शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस खरेदीसाठी आहेत. यामध्ये खरेदी करावी, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचे आदेश पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते.