पुणे – विद्यार्थी वाहतुकीसाठी “पीएमपी’लाही पसंती

पुणे – मध्यवस्तीतील शाळांमध्ये उपनगरांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. शाळा आणि घर यातील अंतर कापण्यासाठी पालक खासगी वाहनांना प्राधान्य देतात. स्कूल बस, व्हॅन, रिक्षासह पीएमपीच्या बसेस देखील शालेय विद्यार्थी वाहतुकीबाबत पसंतीस उतरत आहेत.

यंदा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या 53 बसेसना शहरातील 31 शाळांनी पसंती दर्शविली आहे. गेल्या वर्षी 52 बसेसचा वापर शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी झाला होता. अन्य जादा बसेस प्रमाणेच शालेय वाहतुकीसाठी सोडण्यात येणाऱ्या बसेसमुळे पीएमपीच्या उत्पन्नाला देखील हातभार लागणार आहे. यासाठी स्वारगेट, न.ता.वाडी, कात्रज, कोथरुड अशा एकूण 10 डेपोंतून 53 बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेसना प्रति किलोमीटर 68 रुपये दर आकारण्यात येतो. या सेवेअंतर्गत कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 60 किलोमीटर अंतरांपर्यंत या बसेस धावतात.

डिझेल बसेस कितपत सुरक्षित?
शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी पीएमपीकडून डिझेलवर धावणाऱ्या बसेस पुरविण्यात येतात. शहरामध्ये ब्रेकडाऊन होणे, क्‍लच फेल होणे, आग लागणे, खिडक्‍यांची दुरवस्था, धुरामुळे होणारे प्रदूषण आदी कारणांना पीएमपीच्या डिझेल बसेस जबाबदार असतात. त्यामुळे शाळांसाठीच्या बसेस कितपत सुरक्षित आहेत, असा सवाल आहे. याबाबत पीएमपी प्रशासनाने बसेसची तपासणी करुन बसेसची निवड केल्याचे सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.