पुणे लीग कबड्डी स्पर्धेस 18 जुलैपासून प्रारंभ

पुणे – राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या पुणे लीग कबड्डी स्पर्धेस 18 जुलैपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडानगरीत 21 जुलैपर्यंत चालणार आहे. त्याकरिता पुरुष व महिला असे दोन विभाग ठेवण्यात आले आहेत. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा होईल.

या स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून पुरुषांचे 100 सहभागी संघातून 400 पुरुष खेळाडू सहभागी झाले होते त्यापैकी 82 संघातून 120 पुरुषांची निवड करून त्यांची 8 संघांमध्ये विभागणी केली त्यामुळे प्रत्येक संघात 15 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. चाचणी स्पर्धेत महिलांचे 25 सहभागी संघ सहभागी झाले होते. त्यामधून 84 महिलांची निवड करून त्यांची 6 संघात विभागणी केली त्यामुळे प्रत्येक संघात 14 खेळाडूंचा समावेश आहे.

चाचणीकरिता पुरुष विभागात आत्माराम कदम, दत्तात्रय कळमकर, भाऊ करपे, योगेश यादव, सचिन शिंदे, उमेश गालिंदे, यांनी तर महिला विभागात मोहिणी चाफेकर, सुजाता समगीर, कविता आल्हाट, शीतल मारणे, विद्या पठारे, मिरा शेळके यांनी निवड समिती म्हणून काम केले. लीग स्पर्धेकरिता पुरुषांचे 8 व महिलांचे 6 संघ तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेकरिता एकूण 12 लाख 91 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहेत. खेळाडूंचे सराव शिबीर दि. 13 ते 17 जुलै या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे-बालेवाडी) येथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.

पुरुष व महिला संघांच्या कर्णधारांची नावे खालील प्रमाणे आहेत.

पुरुष गट – (संघाचे नाव व कर्णधाराचे नाव याप्रमाणे)-बलाढ्य बारामती-आदिनाथ घुले, वेगवान पुणे-प्रदीप दुर्गे, लयभारी पिंपरी चिंचवड-अमोल नखाते, झुंजार खेड-अक्षय वाढाने, माय मुळशी-सचिन पाटील, छावा पुरंदर-अभिजित चौधरी, सिंहगड हवेली-निखील ससार, शिवनेरी जुन्नर-मनोज बोंद्रे.

महिला गट – (संघाचे नाव व कर्णधाराचे नाव याप्रमाणे)-बलाढ्य बारामती-आदिती जाधव, वेगवान पुणे-लीना जमदाडे, लयभारी पिंपरी चिंचवड-हर्षदा सोनवणे, झुंजार खेड-तृप्ती लांडगे, माय मुळशी-मानसी रोडे, छावा पुरंदर-आरती बोडके

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.