पुणे -पुणे विभागांतर्गत पुणे ते कोल्हापूर मार्गावर शेनोली ते ताकारी स्थानकांदरम्यान दि. 20 ते 25 जून या कालावधीत तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, पुणे-कोल्हापूर मार्गावरील काही रेल्वे रद्द करण्यात येणार आहेत.
रद्द रेल्वे पुढीलप्रमाणे –
सकाळी 9.15 वाजता सुटणारी पुणे ते कोल्हापूर पॅसेंजर (71419)
पहाटे 4.45 वाजता सुटणारी कोल्हापूर ते पुणे पॅसेंजर (71420)
सकाळी 5.20 वाजता सुटणारी सातारा ते कोल्हापूर पॅसेंजर (71429)
सायंकाळी 4.50 वाजता सुटणारी कोल्हापूर ते सातारा पॅसेंजर (71430)