पुणे-कोल्हापूर-पुणे पॅसेंजर दि.31 मेपर्यंत रद्द

पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने दि. 20 मे ते 31 मे या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. शेनोली- भवानीनगर- ताकरी स्थानकांदरम्यान सुरू असणाऱ्या “डबलिंग’च्या कामास्तव रेल्वे गाड्यांच्या वेळामध्ये बदल होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर गाडी संख्या 51409(71419), पुणे-कोल्हापूर पॅसेंजर 51442(71420), कोल्हापूर-सातारा पॅसेंजर गाडी संख्या 51441/51442 (71430/71429) या गाड्या दि. 23 मे से 31 मे या कालावधीमध्ये रद्द करण्यात येणार आहेत.

तर दि. 31 मे रोजी कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्‍स्प्रेसला तब्बल 2 तास उशिराने दाखल होणार आहे. ही गाडी नियोजित वेळेनुसार 3 वाजून 15 मिनिटांनी सुटणार सूटन 5 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार आहे. याशिवाय सीएमटीएम-कोल्हापूर एक्‍स्प्रेस दि.31 रोजी दोन तास उशिरा दाखल होणार आहे. ही गाडी पुणे ते कराड या मार्गावर प्रभावित होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here