पुणे – शहरात बुधवारी दिवसभरात 311 नव्या करोना बाधितांची नोंद झाली असून, 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 456 जण बरे झाले आहेत.
आजपर्यंत 25 लाख 55 हजार 583 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आल्या. त्यात बुधवारी दिवसभरात केलेल्या 6 हजार 758 टेस्टचा समावेश आहे. यातील 4 लाख 73 हजार 039 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यातील 4 लाख 61 हजार 063 जण बरे झाले आहेत. बाधितांमधील 3 हजार 539 सक्रीय रुग्ण असून, त्यातील 563 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 1 हजार 49 जणांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 23 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 8 जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत 8 हजार 437 जणांचा मृत्यू झाला आहे.